शांतीवनात ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन; फ. म. शहाजिंदे अध्यक्ष
बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन येथे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून बैठकीत ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची अध्यक्षपदी एकमता
शांतीवनात ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन; फ. म. शहाजिंदे अध्यक्ष


बीड, 24 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन येथे ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन होणार आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून बैठकीत ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

फ. म. शहाजिंदे यांची निधर्मी, आदम, ग्वाही, झोंबणी, शेतकरी इत्यादी कवितासंग्रह, मी तू ही कादंबरी तर सारांश, इत्यर्थ, शब्दबिंब इत्यादी समीक्षाग्रंथ, वाकळ, प्रत्यय, अनुभव हे लेखसंग्रह, मराठवाड्यातील कविता, पुरचुंडी, मुठभर माती, आशय व अन्वयार्थ, मुस्लिम मराठी साहित्यः प्रेरणा आणि स्वरूप ही संपादने प्रसिद्ध आहेत.

यापूर्वी ते पाचवे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, वाकुळणी, जि. जालना, पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, निलंगा जि. लातूर, पाचवे पुरोगामी मराठी साहित्य संमेलन, कंधार जि. जि. नांदेड, तिसरे शेकोटी साहित्य संमेलन, धारगळ गोवा इत्यादी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविलेली आहेत. लेखनासाठी त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande