अमरावती : चिल्लर नाणे देत उचलला नामांकन अर्ज
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)।अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकन अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापेठ झोनमधून विवेकानंद प्रभाग क्रमांक १२ येथून ओपन पुरुष गटासाठी समर्थकांसह नामांकन अर्ज उचलण्यात आला. तसेच खुल्या प
चिल्लर नाणे देत उचलला नामांकन अर्ज


अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)।अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकन अर्ज उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापेठ झोनमधून विवेकानंद प्रभाग क्रमांक १२ येथून ओपन पुरुष गटासाठी समर्थकांसह नामांकन अर्ज उचलण्यात आला. तसेच खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार म्हणून सौ. ज्योती सुभाष श्रीखंडे यांच्यासाठीही नामांकन अर्ज घेण्यात आला.

नामांकन अर्ज उचलताना आवश्यक नामांकन शुल्क कॉईनच्या स्वरूपात भरपाई करण्यात आली. ही रक्कम अधिकृत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारली. नामांकन प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी उमेदवार व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून आगामी मनपा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande