
पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्जांचे वितरण सुरू झाले आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून,त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज अ,ब,क,ड,इ,फ,ग व ह या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण २ हजार २१२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु