नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.
नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.

भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२६ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande