अंबाजोगाई येथे ४ ते ९ जानेवारी दरम्यान बालझुंबड
बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळातर्फे सलग २६ व्या वर्षी ''बालझुंबड''चे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान हा उपक्रम अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळांसाठी होणार आहे. बालझुंबड म्हणजे विद्यार्थ
अंबाजोगाई येथे ४ ते ९ जानेवारी दरम्यान बालझुंबड


बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळातर्फे सलग २६ व्या वर्षी 'बालझुंबड'चे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान हा उपक्रम अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शाळांसाठी होणार आहे. बालझुंबड म्हणजे विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते. यंदाही तालुक्यातील १०० ते १५० शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमात इयत्ता १ ली ते ४ थीसाठी रंगभरण, चित्रकला, वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा होतील. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पीपीटी, प्रश्नमंजुषा, चित्रकला, नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश आहे. सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक ३ जानेवारी २०२६ आहे. मागील २५ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. गेल्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला.

होता. दरवर्षी १५० हून अधिक शाळांचा सहभाग असतो. अनेक विद्यार्थ्यांनी याच मंचावरून पुढे जाऊन नाटक, सिनेमा, क्रीडा क्षेत्रात नाव कमावले आहे. अनेक शाळांमध्ये स्नेहसंमेलन होत नाही. अशा शाळांसाठी बालझुंबड ही पर्वणी ठरते. उपक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी 'बालझुंबड-२०२६' समन्वयक, जोधाप्रसादजी माध्यमिक विद्यालय, गुरुवार पेठ, अंबाजोगाई येथे संपर्क साधावा. हे विद्यार्थी स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी परवणी ठरणार आहे. या बालझुंबडमध्ये जास्तीत जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व्यायाम व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande