
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूर-पुणे दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेसला तत्काळ तिकीट बुकींग करण्यासासाठी ओटीपी प्रणाली सुरू झाली असून तसेच मध्य रेल्वेच्या अन्य गाड्यांनाही तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित नवीन प्रमाणीकरण प्रणाली सुरू झाली आहे.
शहर जिल्ह्यातील प्रवाशांना हुतात्मा एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करण्यासाठी तत्काळ तिकीटाचे बुकिंग करण्यासाठी यापुढे नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली अंमलात आणत आहे. तसेच, मध्य रेल्वेच्या अन्य पाच गाड्यांसाठी तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ही नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करण्यात आली आहे.
ही नवी प्रणाली संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइट/अॅपद्वारे बुक करण्यात येणार्या तत्काळ तिकिटांसाठी लागू राहील. ओटीपीची यशस्वी पडताळणी झाल्यानंतर तत्काळ तिकीट जारी करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड