मंगळवेढा शहरातील भूमिगत गटार
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। मंगळवेढा शहरातील भूमिगत गटार, समांतर जलवाहिनी अन्य विकास कामासाठी आवश्यक तो निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून
मंगळवेढा शहरातील भूमिगत गटार


सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।

मंगळवेढा शहरातील भूमिगत गटार, समांतर जलवाहिनी अन्य विकास कामासाठी आवश्यक तो निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तिर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुनंदा आवताडे या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्याबद्दल आज त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता त्यावेळी हे सुतोवाच केले. तत्पूर्वी सुनंदा अवताडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, शिक्षण मंत्री दादा भुसे, जेष्ठ नेते बबनराव आवताडे, सिद्धाराम म्हेत्रे,शिवसेना तालुकाध्यक्ष आबा लांडे, महेश साठे, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुनंदा अवताडे यांनी शहरातील नागरिकांच्या ज्या मूलभूत प्रश्नाला सामोरे जावे लागते आहे. त्यामध्ये गटार, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य या विषयाला केंद्रबिंदू मानून प्रचारा दरम्यान हे मुद्दे प्रभावीपणे मांडले होते त्या दृष्टीने त्यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं त्यानंतर त्याच गोष्टीला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande