बीड - चिंचवण येथे २७ डिसेंबरपासून राजा मकरध्वज महाराज जन्मोत्सव
बीड, 25 डिसेंबर, (हिं.स.)। चिंचवणचे ग्रामदैवत श्री राजा मक्रध्वज महाराज यांचा जन्मोत्सव यंदाही भक्तिभावात साजरा होणार आहे. २७ डिसेंबर २०२५ पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होईल. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. या सप्ताहात हरिपाठ, अभंग-
बीड - चिंचवण येथे २७ डिसेंबरपासून राजा मकरध्वज महाराज जन्मोत्सव


बीड, 25 डिसेंबर, (हिं.स.)। चिंचवणचे ग्रामदैवत श्री राजा मक्रध्वज महाराज यांचा जन्मोत्सव यंदाही भक्तिभावात साजरा होणार आहे. २७ डिसेंबर २०२५ पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होईल. संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या सप्ताहात हरिपाठ, अभंग-भजन, कीर्तन, प्रवचन, पारायण आणि नामस्मरणाचे कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत ह.भ.प. महाराज, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू राहतील. जिल्हाभरातील टाळकरी, माळकरी, वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामरंग वारकरी मंडळी आणि उत्सव समिती, मक्रध्वज चिंचवन यांनी केले आहे. राजा मक्रध्वज महाराजांच्या कृपेने हा सोहळा समाजात एकोपा, श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतो. यंदाही हा सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande