
पुणे, 25 डिसेंबर, (हिं.स.)। इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) येथील वाहन चाचणी ट्रॅकची दुरुस्तीच्या कामकाजामुळे पक्की अनुज्ञप्ती चाचणी २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
अनुज्ञप्ती चालक चाचणीकरीता अपॉईंटमेट घेतलेल्या उमेदवारांना सारथी प्रणालीवरून आपली पक्की अनुज्ञप्ती चाचणी २९ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुर्नप्रस्थापीत करण्यात आला असून त्या आशयाचा संदेश अर्जदारास पाठविण्यात आलेला आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु