
धुळे, 25 डिसेंबर (हिं.स.) श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळ येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अशोकजी थोरात,माजी डीन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले .या प्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब सुभाषजी देवरे, उपाध्यक्ष विलासजी देवरे, ,उपाध्यक्ष,शिवाजी विद्या प्रसारक संस्था बापूसाहेब सिसोदे , सौ अश्विनीताई देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आली. वार्षिक स्नेहसंमेलन या वर्षी 'गर्जना' ही संकल्पना वर आधारित छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे काही शूरवीर मावळे जिवा महाला, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, संताजी घोरपडे, हंबीरराव मोहिते, बहिरजी नाईक, तानाजी मालुसरे आदी मावळ्याचे अभिनय नृत्य स्वरूपात विद्याथ्यांनी सादर केला.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्याच प्रामुख्याने 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली ते इ.10 वी यामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच चालु शैक्षणिक वर्षात संगीत, स्पोर्ट्स, कला, सीबीएससी सायन्स चॅलेंज, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा, डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मा.प्राचार्य आशिष काटे यांनी आपल्या शाळेचे शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती अधोरेखित केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा, सहशालेय उपक्रम, क्रीडा व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाविषयी त्यांनी वार्षिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमात सर्व पालक, विद्यार्थी, मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोलाचे सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर