लातूर : जांब येथील जनावरांच्या आठवडी बाजारात लाखो रुपयाची उलाढाल
लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। जळकोट पासून जवळ असलेल्या जांब (बु) या ठिकाणी गत वीस वर्षांपासून जनावरांचा मोठा बाजार भरतो. विशेष म्हणजे या ठिकाणी बैल विक्री तसेच खरेदीस प्राधान्य असते दर आठवडी बाजारामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होत असते. जांब येथील जन
लातूर : जांब येथील जनावरांच्या आठवडी बाजारात लाखो रुपयाची उलाढाल


लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।

जळकोट पासून जवळ असलेल्या जांब (बु) या ठिकाणी गत वीस वर्षांपासून जनावरांचा मोठा बाजार भरतो. विशेष म्हणजे या ठिकाणी बैल विक्री तसेच खरेदीस प्राधान्य असते दर आठवडी बाजारामध्ये लाखो रुपयाची उलाढाल होत असते.

जांब येथील जनावरांच्या बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीला बाजार भरवताना अडचणी आल्या परंतु ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत अडचणीवर मात करत हा बाजार टिकविण्याचे काम केले. आज जवळपास दहा ते पंधरा एकर क्षेत्रावर मुखेड रोडवर हा बैल बाजार भरतो आहे . हा बाजार राज्यभरामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे. धुळे , नंदुरबार या जिल्ह्यास विदर्भातील तसेच मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यातून बैल विक्रीसाठी जांबच्या बाजारामध्ये येत असतात . विशेष म्हणजे कर्नाटक तसेच तेलंगाना या राज्यांमधूनही बैल हे विक्रीसाठी येत आहेत. या बाजारामध्ये खरेदी व विक्री करणा-या शेतक-यांची संख्या अधिक आहे यामुळे या बाजारास विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे .

जांब येथील बाजारामध्ये बैला सोबतच दुग्धवर्गीय गाई तसेच म्हशीचीही खरेदी व विक्री मोठ्या प्रमाणात होते . जळकोट तालुक्याच्या शेजारी हा बाजार भरत असल्यामुळे या ठिकाणी जळकोट तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदी व विक्रीसाठी जात असतात. या जांबच्या बाजारामुळे अनेक बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध झालेला आहे. या बाजारामुळे खरेदी विक्री करून देण्यासाठी जो मध्यस्थ लागतो त्यांची संख्याही वाढली आहे , यासोबतच बैलाला लागणारा चारा विक्री, पाणी विक्री , बैल बांधण्यासाठी दोरी विक्री , खुंटी विक्री , यासोबतच बैलाचे शिंग काढणे, यामधूनही अनेकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. यासोबतच या बाजाराच्या माध्यमातून जांब येथे बाहेरून येणा-या नागरिकांची संख्या वाढत असून याचा फायदा इतर व्यवसायिकांनाही मिळत आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande