जयकुमार गोरे शहरातील भाजप संपवण्यासाठी आलेत - पुरुषोत्तम पोबत्ती
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील भाजप संपवण्यासाठी आले आहेत. गोरे आणि कोठे यांच्यामुळे मूळ भाजप हरवत चालली आहे, अशा शब्दांमध्ये भाजपचे कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती यांनी टीका केली. बुधवारी सिव्हिल चौक येथील
जयकुमार गोरे शहरातील भाजप संपवण्यासाठी आलेत - पुरुषोत्तम पोबत्ती


सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील भाजप संपवण्यासाठी आले आहेत. गोरे आणि कोठे यांच्यामुळे मूळ भाजप हरवत चालली आहे, अशा शब्दांमध्ये भाजपचे कार्यकर्ते पुरुषोत्तम पोबत्ती यांनी टीका केली. बुधवारी सिव्हिल चौक येथील भाजप कार्यालयासमोर बसून आंदोलन केले. आपण भाजपमध्ये 1982 पासून काम करत असून कोठे कुटुंबाने भाजपला गिळंकृत केले आहे. तर भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर या पक्षाच्या मालक झाल्यासारखे वागत आहेत, अशा शब्दांमध्ये टीका केली.

सध्या भाजपमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश होत असल्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकजण आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, असे गृहित धरून संताप व्यक्त करत आहेत. सोलापूर शहर उत्तर, दक्षिण, मध्य या तीनही मतदारसंघातील मूळ भाजप कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. जर भाजपने मूळ रूपाला आले नाही तर भाजप संपूर्ण जाईल. सध्या भाजपची अवस्था ही काँग्रेसमय झाली आहे. आता जर कोण पक्षाच्या विरोधात बोलायला गेले तर नगरसेवक पदासाठी उमेदवारी कपात होईल, या भीतीने कोणी बोलायला तयार नाहीत. परंतु उद्या पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही पोबत्ती यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande