पुणे - प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ''प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती'' महा
पुणे - प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर


पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 'प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती' महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्य सचिवपदी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे आणि 'पेड न्यूज' सारख्या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे काम करणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कक्ष कार्यान्वित केले आहेत. उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रसारित होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन तसेच पेड न्यूज सारख्या प्रकारांवर देखरेख ठेवण्यासाठी सहा सदस्यीय प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापित करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त प्रदीप जाधव, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, कायदा विभागाचे उपायुक्त राजेश आगळे हे समितीचे सदस्य आहेत. निवडणुकीदरम्यान उमेदवार व राजकीय पक्ष विविध मुद्रित माध्यमे, टीव्ही चॅनल्स, सोशल मीडिया आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचार करत असतात. यामध्ये बातम्यांच्या स्वरूपात पैसे देऊन (पेड न्यूज) प्रचार केला जाऊ नये, यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande