विमानतळाच्या उभारणीपूर्वी पुरंदरमध्ये कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्र
पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)।पुरंदर विमानतळाची उभारणी होण्यापूर्वी त्यासाठी लागणारे कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पुरंदरमध्ये कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणव
airport


पुणे, 25 डिसेंबर (हिं.स.)।पुरंदर विमानतळाची उभारणी होण्यापूर्वी त्यासाठी लागणारे कौशल्याधारित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पुरंदरमध्ये कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. विमानतळासाठी तीन हजार एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठीचे मोबदला सूत्रही राज्य शासनाने निश्चित करण्यात आले.

आहे.भूसंपादनाचा मोबदला, जमीन परतावा वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा एकरी दर वाढवून देण्यात येणार असून, मोबदल्याच्या स्वरूपात १० टक्क्यांऐवजी वाढीव जमीन देण्यास आणि विमानतळ कंपनीत शेतकऱ्यांना भागीदारी देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागण्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या आहेत. त्यानुसार तातडीने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande