तारिक रहमान १७ वर्षांनी घरी परतले; ढाक्यामध्ये जमली गर्दी
ढाका, 25 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे प्रम
१७ वर्षांनी तारिक रहमान घरी परतले; ढाक्यामध्ये जमली गर्दी


ढाका, 25 डिसेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये युवा नेता शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे प्रमुख नेते तारिक रहमान यांनी गुरुवारी लंडनहून स्वदेशात परत येत प्रवेश केला आहे. आज तारिक रहमान ढाक्यामधील एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

ढाक्यामधील सभास्थळी तारिक रहमान यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला आहे. ढाक्यात उसळलेला हा जनसागर देशाच्या राजकारणात नवी हालचाल निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर जमलेली प्रचंड गर्दी, तिचा उत्साह, पक्षाचे झेंडे, घोषणाबाजी आणि जोश यावरून हे केवळ स्वागत समारंभ नसून, त्यामागे खोल राजकीय संदेश दडलेले असल्याचे स्पष्ट होते.

दीर्घकाळ परदेशात राहून पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या तारिक रहमान यांच्या नावावर ढाक्यात ज्या पद्धतीने समर्थकांची गर्दी जमली आहे, त्यातून बांगलादेशातील सर्वच राजकीय पक्षांना मोठा संकेत मिळाला आहे. बीएनपी समर्थकांच्या मते, ही गर्दी पक्षाची तळागाळातील पकड आणि जनतेत वाढत असलेल्या असंतोषाचे प्रतीक आहे.

ढाक्यात जमलेल्या बीएनपी समर्थकांच्या या प्रचंड गर्दीकडे पक्षाच्या शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. दीर्घकाळ विरोधी पक्षात असलेल्या बीएनपीचे हे शक्तिप्रदर्शन, खालिदा जिया यांचा पक्ष अद्याप पूर्णपणे कमकुवत झालेला नाही, याचा इशारा देणारे आहे. तारिक रहमान यांच्या नावावर जमलेली ही गर्दी भविष्यातील राजकीय रणनीतीचा एक झलक (ट्रेलर) असू शकते.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी तारिक रहमान यांची स्वदेशात झालेली परतफेर बीएनपीसाठी संजीवनी ठरेल. याचा परिणाम आगामी निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीवरही दिसून येण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत काही जण तारिक रहमान यांच्याकडे बांगलादेशच्या भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहेत.जमात-ए-इस्लामीसारख्या कट्टरपंथी पक्षांसोबत मोठ्या प्रमाणावर लोक जाण्याची शक्यता मात्र कमी असल्याचेही सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande