सोलापूर - विश्वस्त बरखास्तीचा अर्ज फेटाळला
सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांचा अर्ज पुणे विभागाचे सह. आयुक्त राहुल मामू यांनी फेटाळला. ट्रस्टचे नियमन करताना विश्वस्तांच्या हातून घडले
सोलापूर - विश्वस्त बरखास्तीचा अर्ज फेटाळला


सोलापूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी करणारा संजय भीमाशंकर थोबडे यांचा अर्ज पुणे विभागाचे सह. आयुक्त राहुल मामू यांनी फेटाळला.

ट्रस्टचे नियमन करताना विश्वस्तांच्या हातून घडलेल्या काही कृती या ट्रस्टचे जाणीवपूर्वक नुकसान करणार्‍या तसेच विश्वस्तांना वैयक्तिक लाभ मिळवून देण्यासाठी हेतुपूर्वक केल्या नसतील. तत्कालीन परिस्थितीनुसार ट्रस्टच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी काही निर्णय घ्यावे लागले असतील, तर त्यासाठी विश्वस्त मंडळ बरखास्तीसारख्या टोकाच्या निर्णयाची आवश्यकता नाही. सुधारात्मक उपाय करण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे, अशी मार्गदर्शक तत्वे या निकालामध्ये अधोरेखित केली आहेत.

श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी ही धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह सुमारे पस्तीस विश्वस्त कार्यरत आहेत. त्यांच्या बरखास्तीचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याचबरोबर या विश्वस्त मंडळातील नेमणुकांबद्दलचे सर्व बदल अर्ज एक वर्षाच्या आत निकाली काढण्याचे आदेश सोलापूरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले. या आदेशामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निरीक्षक नियुक्त करून दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande