चांदूरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकाला जीवे मारण्याच्या धमक्या, अभिनंदन करणारे बॅनर फाडलं
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.) चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये हर्षल वाघ अपक्ष म्हणून विजय झाले. त्यांच्या सोबतच प्रा.प्रियंका विश्वकर्मा या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या म्हणून त्यांच्या समर्थकांनी व शुभचिंतकांनी
नवनिर्वाचित नगरसेवकाला जीवे मारण्याच्या धमक्या  अभिनंदन करणारे बॅनर फाडलं


अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)

चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये हर्षल वाघ अपक्ष म्हणून विजय झाले. त्यांच्या सोबतच प्रा.प्रियंका विश्वकर्मा या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या म्हणून त्यांच्या समर्थकांनी व शुभचिंतकांनी चांदूर रेल्वे शहरात ठिकठिकाणी आपलं चांदूर रेल्वे पॅनलचे अभिनंदन करणारे बॅनर-फलक लावले. त्यापैकी चांदूर रेल्वे येथील सिनेमा चौक परिसरातील काही बॅनर लावले. ते बॅनर मंगळवारी रात्री (ता.२३) फाडण्यात आले. सदर प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तसेच नवनिर्वाचीत नगरसेवक हर्षल वाघ यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हर्षल वाघ यांच्या लेखी तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरूध्द एन.सी. गुन्हा दाखल केला आहे. चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाने हर्षल वाघ व त्यांच्या पत्नीला पक्षाची तिकिट दिली नाही. त्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाकरीता प्रभाग क्र.4 मध्ये आपलं चांदूर पॅनेल ला साथ देत उमेदवारी अर्ज दाखल केला. हर्षल वाघ व आपलं चांदूर रेल्वे पॅनलच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.प्रियंका विश्वकर्मा बहुमतांनी निवडून आले. त्यांचे समर्थक व शुभचिंतकांनी चांदूर रेल्वे शहरात ठिकठिकाणी आपलं चांदूर रेल्वे पॅनलचे अभिनंदन करणारे बॅनर-फलक लावले. त्यापैकी चांदूर रेल्वे येथील सिनेमा चौक परिसरातील काही बॅनर लावले होते. ते बॅनर मंगळवारी (ता.२३) रात्री त्यांच्या विरोधकानी फाडले. सदर प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. बॅनर फाडणारा स्वरूप रोडे, रा.आझाद चौक अन्य काही युवक मध्यरात्री त्यांचे बॅनर फाडून टाकत असतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. या सर्व प्रकारामागे निवडणुकीमध्ये झालेला पराभव पचवू न शकलेले, तसेच प्रचारादरम्यान मर्डर करून टाकू,मारून टाकू, कापून टाकू, गाडीने उडवून देऊ अशी भाषा वापरणारे तसेच विजयी मिरवणूक सुरू असतांन शिवीगाळ तू आपलं चांदुर पॅनल यांचेकडून का लढला ? आता तुझं खरे नाही. तुझा त जीव घेतो,असे म्हणत विक्षिप्त हातवारे करणे. या सर्वांमागे विरोधकांचा डाव असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा भंग करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांकडून होत असल्याचे दिसून येते. तसेच या सर्वांकडून माझ्या व माझ्या परिवाराच्या माझ्या सहकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. आमचे सोबत येत्या काळात कुठलाही उच्च नीच प्रकार घडल्यास अपघात, घातपात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी माझे विरोधक व स्वरूप रोडे यांची सर्वस्वी राहील अशी लेखी तक्रार चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनला हर्षल वाघ यांनी २४ डिसेंबर रोजी दिली. या प्रकरणात चांदूर रेल्वे पोलिसांनी एनसी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande