
लातूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद-शहाजानी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे हा आत्महत्या करणाऱ्या वीस वर्षीय तरुणाच्या आईला रात्री बे रात्री फोन करून व ड्रायव्हरला घरी पाठवून त्रास देत होता मुलाचे आई-वडील व मुलगा हा त्रास सहन करत होते यात या मुलाला त्रास सहन न झाल्याने 20 वर्षांच्या तरुणानं आपली आत्महत्या करण्याच्या आधी त्याने एक व्हिडिओ व्हायरल करत स्वतः आत्महत्या केली हा व्हिडिओ पूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ माजवत असल्याने चर्चेचा विषय होत आहे. या व्हिडीओमध्ये इम्रानने सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूरपडे आणि त्यांचा वाहन चालक तानाजी टेळे यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' आहे. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस याची शपथ घेत असतात. पण, महाराष्ट्र पोलीस दलाला शरमेनं मान खाली घालणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर इम्रान बेलुरे याने दीनदयाल मंगेशकर कॉलेज, औराद शहाजनी येथील झाडात गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
'इम्रानचा मृतदेह ताब्यात घेणार नाही'
दरम्यान, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis