निवडणूक ड्युटीला अनुपस्थिती पडणार महागात, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाने अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्र प्रमुख व मतदान अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र, काही शासकीय, निमशासकीय तसेच खाजगीमहाविद्य
निवडणूक ड्युटीला अनुपस्थिती पडणार महागात, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत


अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)।

राज्य निवडणूक आयोगाने अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्र प्रमुख व मतदान अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. मात्र, काही शासकीय, निमशासकीय तसेच खाजगीमहाविद्यालये व कार्यालये, शाळांमधील अधिकारी व कर्मचारी हे आयोगाने दिलेल्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून वेळेवर वैद्यकीय किंवा ईतर प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती निवडणूक आदेश रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करीत आहेत.निवडणूक कर्तव्यातून सूट मिळविण्यासाठी अर्ज करताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसारच अर्ज सादर करावेत. तसेच, बनावट वैद्यकीय किंवा ईतर प्रमाणपत्र सादर करून निवडणूक कर्तव्यातून सुट मागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची शासकीय वैद्यकीय तज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.तपासणीअंती प्रमाणपत्र बनावट किंवा खोटे आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे दि. २ ऑगस्ट २००६ चे परिपत्रक तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande