
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत राज्यभरात सर्वाधिक जागा जिंकून अव्वल ठरलेल्या भाजपने आता आगामी महापालिका निवडणुकीसाठीही चांगलीच कंबर कसली आहे. त्यानुसार पुणे शहरात तर भाजपने प्रचाराचा धडाका सुरू करत आघाडीही घेतली आहे.पुणे शहरात जागोजागी भाजपने आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचे मोठे फलक लावले आहेत, जे पुणेकरांचे लक्ष देखील वेधून घेत आहे. एकीकडे भाजपने प्रचारास जोरदार सुरूवात केली आहे. तर तर दुसरीकडे अन्य पक्ष अद्यापही चर्चेच्या फेऱ्यातच अडकले आहेत. विरोधी पक्षांचं अद्यापही जागांबाबत एकमत होत नसल्याचं दिसत आहे.तर भाजपने प्रचार आघाडी घेतल्याने शहरात चांगलीच वातावरण निर्मीती झाली आहे. याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना नक्कीच मिळेल, असे दिसत आहे. शिवाय, भाजपचे स्थानिक नेतेही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नियोजन करून कामाला लागल्याचे दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु