अमरावती : चिचफळ भागात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त, एक आरोपी ताब्यात
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.) प्रतिबंधित नायलॉन मांजावर राजापेठ पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत आरोपीच्या घरातून २०,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी बेकायदेशीर नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध
चिचफैल भागात प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त  एक आरोपी ताब्यात, राजापेठ पोलिसांची कारवाई


अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)

प्रतिबंधित नायलॉन मांजावर राजापेठ पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत आरोपीच्या घरातून २०,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी बेकायदेशीर नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

माहितीनुसार, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिचफैल परिसरात एक व्यक्ती घरातून सरकारी बंदी घातलेला नायलॉन मांजा विकत होता. माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला आणि आरोपी शशिकांत सुभाषराव काटे (५२, चिचफळ) याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान, त्याच्या ताब्यातून मोनो काईट कंपनीच्या नायलॉन मांजाचे १७ आणि ८ गोल्ड कंपनीचा नायलॉन मांजा ८ नग असे एकूण २०,००० रुपयांचा बंदी घातलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आयुक्त राकेश कुमार ओला आणि पोलिस निरीक्षक पुनीतकुलट यांनी ही कारवाई केली. या कारवाईत एपीआय मिलिंद हिवरे, सागर सरदार, पवन तिवारी, दिनेश भिसे, संजय कडू आणि अंकुश काळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिस प्रशासनाने नागरिकांना बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा वापर किवा विक्री करू नये असे आवाहन केले आहे, कारण यामुळे मानवी जीवन, पक्षी आणि पर्यावरणाला गंभीर नुकसान होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande