बारामतीत रविवारी देशातील अत्याधुनिक एआय सेंटरचे होणार उद्घाटन
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणा-या विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उद्घाटन रविवारी होत आहे.अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते,
बारामतीत रविवारी देशातील अत्याधुनिक एआय सेंटरचे होणार उद्घाटन


पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणा-या विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उद्घाटन रविवारी होत आहे.अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता गदिमा सभागृहात हे उदघाटन होणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर व खजिनदार युगेंद्र पवार यांनी या बाबत माहिती दिली.बदलत्या काळाची पावले ओळखत आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत हे केंद्र सुरु होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande