शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण, 20-25 एकरातील सोयाबीनची शेतातच गंजी
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)। शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झालेतर काहींची आता दुरूस्तीहोत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्
शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण 20-25 एकरातील सोयाबीनची शेतातच गंजी


अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)।

शेताची वहिवाट करता यावी म्हणून पांदण रस्त्यांची निर्मिती केली गेली. कालांतराने पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाले. काही रस्ते नष्ट झालेतर काहींची आता दुरूस्तीहोत आहे. असे असले तरी अनेक शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. मोर्शी तालुक्यातील मौजा विष्णोरा येथे असाच प्रकार होत असून काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागामार्फत नाल्याचे खोलीकरण केल्याने शेतकऱ्यांच्या रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांची सोयाबीनचे ढिग शेतातच पडून आहे. अद्याप ते सोयाबीन काढतान आल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

मौजा विष्णोरा येथील राजेंद्र पुंडलिक ठाकरे, विलास वासुदेव ठाकरे, धनराज काशीराव ठाकरे शयाम केशव पांडे, गणेश चांदुरकर, नरेश शिरसाट आदी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी शेतात सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली होती. यातील सोयाबीनची कापणी करण्यात आली असून ते ढीग लावून शेतात ठेवण्यात आले आहे. सोयबीन काढण्यासाठी थ्रेशर, हडंबा यासारखे यंत्रसाहित्य शेतात घेऊन जाणे गरजेचे असते; पण शेतात जाण्याकरिता रस्ताच राहिला नसल्याने सोयाबीनची काढणी रखडली आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची संत्रा झाडे असल्याने रस्त्यामुळे संत्राविकत घेण्याकरिता व्यापारीयेत नाही. त्यामुळेसंत्रापिक सुद्धा शेतातच गळून पडते आहे.

विष्णोरा येथील राजेंद्र ठाकरे यांच्या शेतापर्यंत काही वर्षांपूर्वी रस्ता होता परंतु पाटबंधारे विभागामार्फत त्या नाल्याचे खोलीकरण केले असल्याने रस्ता पूर्णपणे नष्ट झाला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.शेतात सोयाबीन काढणीचा हंगाम उलटला असून परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत विकलेही गेले आहे; परंतु विष्णोरा येथील शेतकऱ्यांना जाण्याकरिता रस्ताच नसल्याने अद्याप सोयाबीनची काढणीही करता आली नाही. परिणामी, त्यांच्यावर कर्जबाजारी होऊन जगण्याची वेळ आली आहे खरीप हंगामातीलच शेतमाल घरी आणता आला नाही तर तूर पिकाचे काय होणार आणि रबी हंगामातील पेरणी कशी करावी, आदी चिता शेतकऱ्याला त्रस्त करीत आहे. महसूल प्रशासनाने पांदण रस्ता मोकळा करून त्याची दुरूस्ती करावी तथा नाले बुजवून शेताची वहिवाट करण्याकरिता रस्ता उपलब्धकरूनद्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande