
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)
अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री निर्मूलनासाठी कायदेशीर कारवाई करून पोलिस विभागाच्या वतीने राज्यस्तरावर मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने गुरुवारी अमरावती शहर पोलिसांनी एमआयडीसी आणि शहराच्या हद्दीत असलेल्या ३७ बंद कारखान्यांची झाडाझडती घेतली, अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिदे आणि डीसीपी श्याम घुगे यांनी दिली.
डीसीपी गणेश शिदे यांनी सांगितले की, राज्यात विविध ठिकाणी ड्रग्जविरुद्ध कारवाई केली जात आहे. कौतुकास्पद अमरावतीमध्येही कारवाई सुरू आहे. हे लक्षात घेऊन पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुरुवारी अमरावतीशहरात विशेष शोधमोहीमराबविण्यात आली. या कारवाईदरम्यान, नांदगावपेठ, राजापेठ, बडनेरा आणि वलगाव पोलिस स्टेशन परिसरातील३७ कारखान्यांची झडती घेण्यात आली. यामध्ये संबंधित पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.शहरातील दुर्गम भाग, औद्योगिक बसाहती, कारखाने, गोदामे आणि इतर भागांसह संवेदनशील ठिकाणी एकाच वेळी शोध घेण्यात आला.टेक्निकल युनिटकडून तपास या कारवाईदरम्यान, डीसीपी शिदे यांनी सांगितले की, बेकायदेशीर ड्रग्ज व्यापारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस वचनबद्ध असून शोध मोहिम सुरु राहिल. ही तपासणी केवळ प्राथमिक उपाययोजना म्हणून करण्यात आली होती, परंतु पुढील तपास तांत्रिक युनिटकडून केला जाईल.जर अचानक मोठ्या प्रमाणात रसायने, ड्रम, प्रयोगशाळेतील उपकरणे, रात्रीच्या वेळी निर्जन भागात संशयास्पद हालचाल, अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही साहित्य किवा इतर संशयास्पद काही आढळले तर त्यांनी त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याला कळवावे आणि ड्रग्जमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी