महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी लातूर पोलिसांचा भरोसा सेल
लातूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार तसेच सामाजिक स्वरूपाच्या तक्रारींचे संवेदनशील व प्रभावी निराकरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर अंतर्गत कार्यरत असलेला “भरोसा सेल (म
महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी लातूर पोलिसांचा “भरोसा सेल” – विश्वास, समुपदेशन व कायदेशीर मदतीचे प्रभावी केंद्र.*


लातूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार तसेच सामाजिक स्वरूपाच्या तक्रारींचे संवेदनशील व प्रभावी निराकरण करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर अंतर्गत कार्यरत असलेला “भरोसा सेल (महिला तक्रार निवारण केंद्र)” हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.

भरोसा सेलच्या माध्यमातून पीडित घटकांना समुपदेशन (Counselling), मार्गदर्शन व आवश्यक ती कायदेशीर मदत विनामूल्य पुरवली जात असून, आजवर अनेक कुटुंबांतील वाद शांततेने मिटविण्यात या सेलने मोलाची भूमिका बजावली आहे.

*भरोसा सेलची उद्दिष्टे.*

महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारास प्रतिबंध करणे,

कौटुंबिक वादांमध्ये संवादातून समेट घडवून आणणे,

पीडितांना मानसिक आधार व कायदेशीर मार्गदर्शन देणे,

समाजात कायदेविषयक जनजागृती करणे.

*भरोसा सेलची प्रमुख कार्ये.*

समुपदेशन (Counselling)

भरोसा सेल येथे प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत पुढील बाबींवर समुपदेशन करण्यात येते –

पती-पत्नीमधील वाद,

सासू-सुनेमधील मतभेद,

कौटुंबिक हिंसाचार,

मानसिक छळ व कौटुंबिक तणाव,

समुपदेशनाच्या माध्यमातून पती-पत्नी व कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढवून समेट घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.

* विवाहित महिलांसाठी विशेष कार्यवाही.*

विवाहित महिलांना त्यांच्या पती किंवा पतीचे नातेवाईक यांच्याकडून शारीरिक अथवा मानसिक छळ तसेच बेकायदेशीर हुंडा किंवा मालमत्तेची मागणी होत असल्यास, अशा महिलांना भरोसा सेलमध्ये अर्ज करता येतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार महिला व गैर-अर्जदार (पती/नातेवाईक) यांना समक्ष बोलावून समुपदेशन करण्यात येते. समुपदेशनानंतर समेट न झाल्यास, अर्जदार पत्नीस प्रचलित कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यास अभिप्राय पत्र दिले जाते.

या प्रक्रियेसाठी वकील किंवा विधीज्ञ सोबत ठेवण्याची मुभा दिली जाते.

विवाहित महिला माहेरी किंवा सासरी – आपल्या सोईनुसार जवळच्या भरोसा सेल कार्यालयात अर्ज करू शकतात.

* महिला व बालकांचे संरक्षण.*

महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी

अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार (POCSO कायद्यान्वये)

बालविवाह प्रतिबंध,बाल तस्करी व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे अशा प्रकरणांमध्ये पीडितांना तक्रार दाखल करणे, वैद्यकीय तपासणी व कायदेशीर कार्यवाहीसाठी संपूर्ण सहकार्य केले जाते.

* ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत.*

आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत – अपत्ये किंवा नातेवाईकांकडून सांभाळ न करणे,

दुर्लक्ष, छळ अथवा परित्याग

अशा प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन, मार्गदर्शन व कायदेशीर मदत पुरवली जाते.,निर्वाह भत्ता मिळण्यासाठी संबंधित न्यायाधिकरणाकडे अर्ज करता येतो.

या कायद्यानुसार मा. उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे न्यायाधिकरण म्हणून नियुक्त असून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दोषींना कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.

*सन 2025 मधील कार्यवाहीचा आढावा.*

सन 2025 मध्ये भरोसा सेलमध्ये एकूण 721 तक्रारी दाखल झाल्या. मा. पोलीस अधीक्षक व मा. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यापैकी –

154 प्रकरणांमध्ये समेट होऊन संसार पुन्हा नांदण्यास सुरुवात झाली,

252 प्रकरणे समुपदेशनानंतर बंद करण्यात आली,

233 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले,

एकूण 639 प्रकरणांची निर्गती करण्यात आली आहे.

*भरोसा सेल अंतर्गत मनोधैर्य योजना कार्य आणि कामगिरी.*

लैंगिक अत्याचार व ॲसिड हल्ल्यांच्या पीडितांसाठी महाराष्ट्र शासनाची “मनोधैर्य योजना” – आर्थिक मदत, मानसिक आधार व पुनर्वसनाचे प्रभावी साधन.

महिला व बालकांवरील बलात्कार, लैंगिक अत्याचार तसेच ॲसिड हल्ल्यासारख्या अत्यंत गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या पीडितांना तात्काळ आधार व पुनर्वसन देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत “मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत पीडित महिला व बालकांना आर्थिक मदत, मानसिक आधार, कायदेशीर मदत व सामाजिक पुनर्वसन प्रदान करून त्यांना मानसिक आघातातून सावरण्यास व नव्याने आत्मविश्वासाने जीवन सुरू करण्यास मदत केली जाते.

लातूर पोलिसाच्या भरोसा शून्य महत्त्वाची समन्वयकाची भूमिका बजावून 11 गुन्ह्यातील पिढीताना शासनाकडून 17 लाख 50 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.

*भरोसा सेल अंतर्गत दक्षता समिती यांचे मार्फतीने विशेष उपक्रम.*

भरोसा सेल अंतर्गत भरोसा सेल येथील अधिकारी व अंमलदार यांनी महिला दक्षता समितीचे सदस्य यांचे समवेत शाळा कॉलेजे येथील किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करून बालकांचे सुरक्षा,अधिकार आणि हेल्पलाईन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

लातूर पोलिसांच्या भरोसासेल चे कामकाज वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे व त्यांची टीम चोखपणे पार पाडत आहे.

*लातूर पोलिसांचा नागरिकांना संदेश.*

महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा छळ, अन्याय किंवा कौटुंबिक हिंसाचार सहन न करता निःसंकोचपणे “भरोसा सेल”शी आणि पोलीस हेल्प लाईन 112 वर संपर्क साधावा.लातूर पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande