
नवी दिल्ली, 26 डिसेंबर (हिं.स.)।
जागतिक किर्तीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण डॉ. राम वनजी सुतार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या दि. २७ डिसेंबर रोजी भीम ऑडिटोरियम, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ, नवी दिल्ली येथे दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान होणार आहे. डॉ. सुतार यांचे गेल्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी निधन झाले होते.
डॉ. राम सुतार यांनी सात दशकांहून अधिक कारकीर्दीत शेकडो पुतळ्यांची निर्मिती केली. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची शिल्पे त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या रचना भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे अमर प्रतीक बनल्या आहेत. या सभेस कुटुंबीय, चाहते आणि कला प्रेमी उपस्थित राहणार आहेत, असे अनिल राम सुतार यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी