कचऱ्याची समस्या जटील; मोशीतील डेपोची क्षमता संपली
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। मोशी कचरा डेपोची संपलेली क्षमता, वाढती लोकसंख्या, नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना, कचरा डेपोसाठीचे पुनावळेतील जागेचे आरक्षण प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) रद्द करण्यात आले. त्यामुळे क्षमता संपूनही संप
कचऱ्याची समस्या जटील; मोशीतील डेपोची क्षमता संपली


पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। मोशी कचरा डेपोची संपलेली क्षमता, वाढती लोकसंख्या, नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना, कचरा डेपोसाठीचे पुनावळेतील जागेचे आरक्षण प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) रद्द करण्यात आले. त्यामुळे क्षमता संपूनही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा ३४ वर्षांपासून मोशीतील कचरा डेपोतच टाकला जातो. येथे कचऱ्याचे डोंगर झाले असून, परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त आहेत.महापालिकेकडून कचऱ्याचे डोंगर हटविण्यासाठी विविध उपाय केले जात असले, तरी ते तोकडे पडत आहेत. शहराला नव्या कचरा डेपोची गरज असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पण, कचरा समस्या सोडविण्यासाठी पुढाकार कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. शहराचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटर आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचरा संकलनातही वाढ होत आहे. संपूर्ण शहरात दिवसाला १३०० टन कचरा तयार होतो. त्यात ओला, सुका, हॉटेल, भाजी मंडई, जैववैद्यकीय या प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. महिन्यास ४० हजार टन आणि वर्षाला तब्बल चार कोटी ८० टन कचरा तयार होतो. संपूर्ण शहरातील कचरा घंटागाडीद्वारे संकलित केला जातो. मोशीतील ८१ एकर जागेत हा कचरा जमा केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande