पुणे - निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा तिढा सुटेना
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये जाग
पुणे - निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा तिढा सुटेना


पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा होण्याऐवजी आता रविवारी होण्याची शक्‍यता आहे.महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू केली होती. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून निवडणूक एकत्र लढण्यावरून बैठका सुरू होत्या.विशेषतः मागील आठवडाभरामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून निवडणुकीतील जागांच्या वाटाघाटींबाबत चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही एकत्र लढण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande