
नांदेड, 26 डिसेंबर (हिं.स.)।श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा तालुका उमरी जिल्हा नांदेड च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा लोकसंवाद पुरस्कार आणि सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली.
लोकसंवाद चे सल्लागार तथा ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीस निवड समितीचे सदस्य एडवोकेट एल.जी. पुय्यड , पत्रकार राम तरटे , प्रा.धाराशिव शिराळे आणि संयोजक दिगंबर कदम यांची उपस्थिती होती.
लोकसंवाद उत्कृष्ट पुरस्कारांमध्ये प्रा. डी.बी. जांभनूरकर आणि शिवाजीराव कपाळे यांना यावर्षीचा जीवन गौरव सन्मान जाहीर झाला आहे. डॉ .सौ. ललिता सुस्कर - मनुरकर यांना वैद्यकीय ,डॉ. सतीश दर्शनवाड , शेतकऱ्यांच्या मुलांना क्लासेसच्या फीस मध्ये 50 टक्के सवलत देणारे गिरी क्लासेसचे संचालक प्रा. संतोष गिरी , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम , स्थानिक शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय , प्रा. राजीव सूर्यवंशी , सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, दिगंबर देशमुख, संभाजी शिंदे , गुलाब वडजे यांना यावर्षीचे लोकसंवाद सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 21 व्या लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात नारायण सुर्वे साहित्य नगरी गजानन मंदिर परिसर मालेगाव रोड नांदेड येथे ना. हेमंत पाटील , संमेलन अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर , स्वागत अध्यक्ष गजानन पाम्पटवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis