पीएमपीच्या ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार
पुणे, 26 डिसेंबर, (हिं.स.)। एप्रिल-मे २०२६पर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार आहेत. त्यामुळे बस मार्गांची पुनर्रचना, फेऱ्यांच्या संख्येबाबत पीएमपी प्रशासन पुनरावलोकन करत आहे. सध्या ३९४ बस मार्ग आहेत.त्यांचे पुनरावलोकन झाल
पीएमपीच्या ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार


पुणे, 26 डिसेंबर, (हिं.स.)। एप्रिल-मे २०२६पर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार आहेत. त्यामुळे बस मार्गांची पुनर्रचना, फेऱ्यांच्या संख्येबाबत पीएमपी प्रशासन पुनरावलोकन करत आहे. सध्या ३९४ बस मार्ग आहेत.त्यांचे पुनरावलोकन झाल्यानंतर यात किमान शंभरची वाढ होईल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल. परिणामी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात ‘पीएमपी’चा विस्तार अधिक व्यापक होणार आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यात चार ते पाच महिन्यांत नवीन बस दाखल होणार आहेत. प्रवासी सेवा अधिक मजबूत करण्यासाठी पीएमपी प्रशासन विस्तृतपणे नियोजन करत आहे. मार्गांमध्ये वाढ आणि फेऱ्या वाढविण्यासह बसच्या वेटिंगचे प्रमाण कमी करण्यावरही भर देत आहेत.सध्या बसच्या वेटिंगचे प्रमाण सुमारे २० मिनिटे आहे, ते प्रमाण आठ ते दहा मिनिटांवर आणण्यासाठीही नियोजन सुरू आहे. वेटिंगचे प्रमाण कमी झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होईल. परिणामी प्रवासी संख्येत वाढ होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande