
सोलापूर, 26 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय खलबत पाहायला मिळत आहेत या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती व्हावी असे शहर उत्तर मधील काही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे.पण भारतीय जनता पार्टी कडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी एक बैठक शहराध्यक्षांसोबत झाली परंतु भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये सहकारी माजी नगरसेवक अनिकेत पिसे यांना सोबत घेऊन प्रचंड मोठी रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले.या शक्ती प्रदर्शनाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम, प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत ही भव्य पदयात्रा प्रभागातून काढण्यात आली.या रॅली दरम्यान बोलताना अमोल शिंदे यांनी भाजपसोबत आम्ही युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगताना जर भाजपने विशेष नकार दिला तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद काय आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड