सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर
सोलापूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्
सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर


सोलापूर, 26 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रूजू न झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक व सुरळीत अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत.तसेच निवडणूक आचारसंहिता पालनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून स्थिर देखरेख पथक व इतर निवडणूक कामांसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते.तथापि, आदेश बजावून देखील काही अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, सोलापूर महानगरपालिका डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande