
अमरावती, 27 डिसेंबर, (हिं.स.) अचलपूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपच विजय मिळवेल, असा ठाम विश्वास आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केला.
अलीकडील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला अधिक मते व जागा मिळाल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे. तिकीट वाटपावर चर्चा झाली असली तरी योग्य निर्णय घेतल्यामुळे कोणताही वाद निर्माण झाला नाही, असे आमदार तायडे यांनी सांगितले.
अचलपूर नगरपालिके तील सध्याचे राजकीय चित्र पाहता भाजप पूर्ण ताकदीनिशी जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाईल आणि विजय निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला. जिल्हा परिषद जिंकणारच, असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अचलपूर येथे आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विजयानंतर अचलपूरच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी