डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात नवीन एमआरआय मशीनचे उद्घाटन
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.) डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे अत्याधुनिक एम आर आय मशीनचे उद्घाटन हा या संस्थेचा सामाजिक जाणिवेचा आणि बांधिलकीचा सर्वोत्तम नमुना आहे. दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव देणे म्हणजे केवळ शारीरिक सहाय्य देणे नाही तर त्
डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात नवीन एमआरआय मशीनचे उद्घाटन


अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.) डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथे अत्याधुनिक एम आर आय मशीनचे उद्घाटन हा या संस्थेचा सामाजिक जाणिवेचा आणि बांधिलकीचा सर्वोत्तम नमुना आहे. दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव देणे म्हणजे केवळ शारीरिक सहाय्य देणे नाही तर त्यांना पुन्हा एकदा स्वावलंबी जीवन जगण्याची संधी देणे हे आहे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आशेचा एक नवीन किरण देणारा हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आज एम आर आय मशीन(3Tesla) च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन तसेच जयपूर फूट वितरण उपक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून ना. प्रतापराव जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड.भैयासाहेब पुसदेकर,केशवराव मेतकर, सदस्य सुभाषराव बनसोड,प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेश दादा खोटरे, प्राचार्य पुरुषोत्तम वायाळ यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की एमआरआय सारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेमुळे विदर्भातील सामान्य गरीब आणि ग्रामीण रुग्णांना दर्जेदार तपासण्यासाठी आता दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.वेळेवर निदान आणि योग्य उपचार आणि परवडणारे आरोग्य सेवा हे खऱ्या अर्थाने आरोग्य सेवेचे ध्येय आहे. या दिशेने डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून पारंपारिक वैद्यकीय पद्धती प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांग उपचार पद्धती यांना प्रोत्साहन दिले जात.ग्रामीण वंचित आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे त्यांना संधी देणे आणि त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करणे हे या संस्थेचे मूलभूत उद्दिष्ट राहिले आहे.या संस्थेने शिक्षणासोबत आरोग्य ,समाजसेवा, क्रीडा संस्कृती आणि संशोधन या क्षेत्रातही भरीव काम केले आहे रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी मोहीम असे विविध सामाजिक उपक्रमांमधून संस्थेने भाऊसाहेबांच्या विचारांना सातत्याने कृतीत उतरवण्याचं काम केलं आहे आहे अशा संस्था संस्थात्मक आणि सामाजिक उपक्रमामुळे केंद्र व राज्य सरकारची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून दिलीप बाबू इंगोले यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे आपण संधी द्यावी अशी विनंती नामदार प्रतापराव जाधव यांच्याकडे केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ.ए.टी देशमुख यांनी केले संचालन किशोर इंगळे यांनी केले.

'उमेद-पंख-विश्वासाचे' या सामाजिक उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी निशुल्क जयपुर फुट वितरणाचा कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला, जयपुर फुट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मणियार (पुणे) आणि अंबादास खोब्रागडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. आतापर्यंत या उपक्रमासाठी अकराशे दिव्यांगांनी नोंदणी केली असून 752 दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे वाटप करण्यात आले आहे.कार्यक्रमाला राजेश अग्रवाल पुणे,इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोलाचे डॉ. किशोर मालोकार, जयपुर फुट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मनियार, दि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष आर्टिस्ट रजनी अंबादे, आकाश अंबादे, दानदाते दिपकजी चांडक, सौ. अनिताताई चांडक, प्रभजीत सिंह बच्छेर, मानद सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अकोला, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचे संचालक चंदूभाऊ खेडकर, उमेद-पंख-विश्वासाचे जयपूर फुट वितरण समन्वयक संदिप पुंडकर, माजी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, डॉ. विनीत कौर यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande