अकोला महापालिकेत ही ट्रिपल इंजिन सरकार येणार : आ. सावरकर
अकोला, 27 डिसेंबर (हिं.स.)सकारात्मक प्रचाराच्या माध्यमातून कोणावरही टीका टिपणी न करता विकास कामाचा जोगावा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवावे केंद्र आणि राज्य सरकार आणि अकोला महानगरपालिकेतील कामे ट्रीपल इंजन सरकार यांच्या भरोशावर आप
P


अकोला, 27 डिसेंबर (हिं.स.)सकारात्मक प्रचाराच्या माध्यमातून कोणावरही टीका टिपणी न करता विकास कामाचा जोगावा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवावे केंद्र आणि राज्य सरकार आणि अकोला महानगरपालिकेतील कामे ट्रीपल इंजन सरकार यांच्या भरोशावर आपण निवडणूक जिंकणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकरांनी केले.

आज भाजपा कार्यालयात सोशल मीडिया कक्षाचे उद्घाटन करताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष जयंत मसने हे होते तर यावेळी गिरीश जोशी रिचा शहा ऋचा शहा, शिवा हिंगणे यश सिकरीया,जितेंद्र देशमुख ध्रुवखुणे माधव मानकर विवेक भरणे, प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सोशल मीडियाचा वापर योग्य ते पद्धतीने करून विरोधकांच्या अपप्रचाराला चूक उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने टीम उभी केली असून त्या टीमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षांनी केलेले काम केंद्र राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येईल या दृष्टीने 25 45 जणांची टीम करण्यात आली असून आणि त्या टीमचे काम सुरू झाले आहे भारतीय जनता पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन वर्षाची भेट देण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असून राज राजेश्वर नगरीतील नागरिक हे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे असून त्या प्रेमाच्या बळावर भारतीय जनता पक्ष यश प्राप्त करेल असा विश्वास जयंत ,मसणे यांनी व्यक्त केला

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande