माजलगाव तालुक्यातील धर्मवाडीत १०० जणांची आरोग्य तपासणी
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)। धर्मेवाडी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात सांधेदुखी, मानदुखी, मणक्याचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यासाठी बीपी, शुगर, ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचे आय
माजलगाव तालुक्यातील धर्मवाडीत १०० जणांची आरोग्य तपासणी


बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।

धर्मेवाडी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात सांधेदुखी, मानदुखी, मणक्याचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यासाठी बीपी, शुगर, ईसीजी तपासण्या करण्यात आल्या.

शिबिराचे आयोजन सद्‌गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या वतीने करण्यात आले. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेद कॉलेज व गुरुकृपा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी माळीपारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर झाले. नाशिक येथील प.पू. गुरुमाऊली ट्रस्टचे डॉ. मोहन गवरकर यांनी नाडी परीक्षण केले. त्यांनी

आयुर्वेदिक उपचार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लपलेले आजार यावर माहिती दिली. आयुर्वेद व फिजिओथेरपी उपचार कसे प्रभावी ठरतात हे सांगितले. आयुर्वेदिक कॉलेजकडून डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. कल्पना वर्मा, डॉ. उज्ज्वलसिंग सोलंकी यांनी तपासणी केली. फिजिओथेरपी कॉलेजच्या सपना आढे, अनिमेष अहिरे, अनुजा धाडगे यांनी उपचार केले. अभिजित लांघी, आदित्य लेंढाळ, सायली कुलकर्णी, शिवांजली मेनुरे यांनी सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष पांडुरंग चांडक यांनी केले. या वेळी अण्णासाहेब तौर, इंजि. गजेंद्र खोत, प्रभाकर शेटे, उपसरपंच रेवण यादव, काशीनाथ कोरडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande