जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुरज, संस्कृती, प्रतीक, क्रांती आणि आश्‍विनी यांचे यश
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे आयोजित जिल्हा क्रॉसकंट्री चाचणी स्पर्धेत विविध गटात सुरज नामदेव डुमनर, संस्कृती गजानन वराड, प्रतीक प्रवीण जावळे, क्रांती मुंजाजी
जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुरज, संस्कृती, प्रतीक, क्रांती आणि आश्‍विनी यांचे यश


परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे आयोजित जिल्हा क्रॉसकंट्री चाचणी स्पर्धेत विविध गटात सुरज नामदेव डुमनर, संस्कृती गजानन वराड, प्रतीक प्रवीण जावळे, क्रांती मुंजाजी शिंदे, प्रतीक सुनील पवार, पूजा चनुर्भज शेंबडे, सुमित विलास कोपनर, आश्‍विनी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

स्पर्धेची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या सत्काराने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामराव लोहट होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती गवते (आंतरराष्ट्रीय खेळाडू), रणजित काकडे, कैलास माने, सुरेश नाटकर (क्रीडा अधिकारी), मोहन लोहट, कैलास टेहरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य शिंदे, घरजाळे, क्रीडा अधिकारी कल्याण पोले, संभाजी शेवटे, विश्‍वास पाटील, ज्ञानेश्‍वर रेंगे, ज्ञानेश्‍वर ठोंबरे, सज्जन जैस्वाल, प्रदीप काळे, ओमप्रकाश सूर्यवंशी, दुधारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पंचप्रमुख म्हणून यमुनाजी भालशंकर, गोविंद काजळे, अजय राठोड, अजय कदम, लोंढे सर, राठोड सर यांनी काम पाहिले.संस्थेचे अध्यक्ष रामराव दादा लोहट व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत खुला गट तसेच 16, 18 व 20 वर्षांखालील गटात मोठ्या संख्येने मुले व मुली सहभागी झाल्या होत्या.

या स्पर्धेत 16 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम - सुरज नामदेव डुमनर, द्वितीय - शुभम संजय शिंदे, तृतीय - शिवप्रसाद लक्ष्मण सोनमळे, 16 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम - संस्कृती गजानन वराड, द्वितीय - श्रीशा सुनीलराव देशमुख, तृतीय - किरण गिरीराम सोळंके, 18 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम - प्रतीक प्रवीण जावळे, द्वितीय - अनन्या विनोद जावळे, तृतीय - अर्जुन पांडुरंग भालशंकर, 18 वर्षांखालील मुलींच्या गटात, प्रथम - शिंदे क्रांती मुंजाजी, द्वितीय - अनुजा राधाकिशन जगदाळे, 20 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम - प्रतीक सुनील पवार, द्वितीय - वैभव बालाजी, तृतीय - अशोक रामा बनसोडे, 20 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम - पूजा चनुर्भज शेंबडे, द्वितीय - अपूर्वा नितीन यशवंते, तृतीय - कीर्ती रामदास धायतडक, मुलांच्या खुला गटात प्रथम - सुमित विलास कोपनर, द्वितीय - आकाश रमेशराव ईखे, तृतीय - ऋषिकेश प्रमोद तिळकरी, तर मुलींच्या खूला गटात प्रथम - आश्रि्वनी जाधव, द्वितीय - मयुरी गौतम ढगे व तृतीय - शिवकन्या प्रल्हाद होगे यांनी यश पटकावले. या यशाबद्दल जिजाऊ ज्ञानतीर्थच्या वतीने संस्था सचिव नितीन लोहट व सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी बोबडे यांनी केले.

दरम्यान, या जिल्हास्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची 10 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande