
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
मोरेश्वर संस्थान येथे प. पू. १००८ गुरुवर्य गंगाभारती महाराज यांचा ३३ वा पुण्यतिथी सोहळा १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान साजरा होणार आहे. या ३ दिवसीय सोहळ्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याची सुरुवात १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. समारोप १७ जानेवारी रोजी होईल. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ आरती आणि सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ होणार आहे. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची महापूजा आणि पुष्पवृष्टी होईल. कीर्तनसेवेसाठी नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. १५ जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ विनायक महाराज सातव (बुलढाणा) यांचे कीर्तन होईल. १६ जानेवारी रोजी नवनाथ महाराज गोगावले (पुणे), १७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ काल्याचे कीर्तन पुंडलिक महाराज जाधव (पंढरपूर) यांचे होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरेश्वर संस्थानने केले आहे. या संपूर्ण सोहळ्याचे मार्गदर्शन हरिहर भारती महाराज करत आहेत. कार्यक्रम श्री क्षेत्र तपोवन, मोरेश्वर संस्थान, कोळवाडी येथे होणार आहे. शिष्यमंडळ, भक्तमंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis