
नांदेड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
श्री गुरुगोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्व्हर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पंजाब पोलिस आणि ऑरेंज सिटी नागपूर संघ विजेतेपदासाठी भिडतील.तिसऱ्या स्थानासाठी बीएसएफ जालंधर आणि एमपीटी मुंबई यांच्यात रंगेल.
उपांत्य फेरीतील दोन्ही सामने शूटआऊट (सडन डेथ) प्रणालीने निकालात आले. पहिला उपांत्य सामना पंजाब
पोलिस आणि एमपीटी मुंबई यांच्यात झाला. सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यामुळे निकाल शूटआऊटवर गेला. शूटआऊटमध्ये पंजाबने ५ विरुद्ध ४ गोलांनी विजय मिळवला. दुसरा उपांत्य सामना बीएसएफ जालंधर आणि ऑरेंज सिटी नागपूर यांच्यात झाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ गोल केले. दोन्ही संघांनी उत्कृष्ट ताळमेळ व आक्रमक खेळ खेळला. मात्र सामना बरोबरीत सुटल्याने निकाल शूटआऊटवर लावण्यात आला. यात नागपूरने ५ गोल केले तर, बीएसएफने ४ गोल केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis