
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपा, शिवसेना व मित्रपक्षांमध्ये युती करण्यावर नेत्यांनी शिक्कामोर्तब केले असून, आता जागा वाटपाबाबत चर्चासत्र सुरू आहे; मात्र विधानसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी कुणी युतीधर्माला डावलून 'अधर्म' करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही वेगळ्या विचार करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना (शिंदे गट) चे माजी आ.. अभिजित अडसूळ यांनी आज येथे युवा स्वाभिमानला इशारा दिला.
हटिल महफिलमध्ये महायुतीच्या नेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. त्यावेळी अभिजित अडसूळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. युतीबाबतची चर्चा केवळ भाजप-शिवसेनापुरतीच मर्यादित आहे. भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या, हा त्यांचा विषय आहे; मात्र मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेविरोधात दांपुरात उमेदवार उभे करून चुकीचा पायंडा घातला गेला. आता पुन्हा अधर्म झाला, तर वृती पाळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. यापुढे आमच्या उमेदवाराविरोधात कुणी उमेदवार उभे केले, तर आम्हीही त्यांच्याविरोधात उमेदवार उभे करू, चुकीच्या पद्धतीने उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न झाला, तर युतीला काही अर्थ उरणार नाही, असे अभिजित अडसूळ यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
भाजपाच्यावतीने माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शहराध्य डॉ. नितीन धांडे, जयंत डेहणकर, शिवराय कुळकर्णी, तसेच शिवसेनेच्यावतीने मंत्री संजय राठोड, कॅ. अभिजित अडसूळ, संतोष बद्रे, राम पाटील आदी आजच्या बैठकीत उपस्थित होते. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत या नेत्यांनी दिले.
--------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी