
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
बीड येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाचा उदघाटन समारंभ शिवाजी दादा पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक कार्यक्षमतेस बळकटी देणारी ही इमारत म्हणजे संस्थेचा आत्माच आहे. मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या महत्वपूर्ण कार्यक्रमास आमदार प्रकाश सोळंके उपस्थित होते.
या नूतनीकरणामुळे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाला अधिक सक्षम व अनुकूल सुविधा उपलब्ध होतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis