रविवारी माटुंगा–मुलुंड दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक
मुंबई, २७ डिसेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार, दि. २८.१२.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी खालीलप्रमाणे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे. मुख्य मार्ग माटुंगा – मुलुंड दरम्यान अप आणि डाउ
रविवारी माटुंगा–मुलुंड दरम्यान अप-डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक


मुंबई, २७ डिसेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार, दि. २८.१२.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी खालीलप्रमाणे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे.

मुख्य मार्ग

माटुंगा – मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ११.०५ ते १५.४५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.३६ ते १५.१० वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानक येथून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून ११.०३ ते १५.३८ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून या गाड्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / बांद्रा दरम्यान डाउन हार्बर मार्गावर ११.४० ते १६.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ११.१६ ते १६.४७ वाजेदरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा तसेच १०.४८ ते १६.४३ वाजेदरम्यान बांद्रा / गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल / बेलापूर / वाशी स्थानक येथून ९.५३ ते १५.२० वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव / बांद्रा स्थानक येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी १७.१३ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना १०.०० ते १८.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande