
नांदेड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
बिलोलीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या तलबिड येथील जुगार अड्ड्यावर धाड मारली. यात १२ जुगाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. १ लाखाच्या रोख रक्कमेसह ६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रातोळी येथील हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावरही उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी धाड मारून २९ जुगाऱ्यांना अटक केली होती.
तलबीड शिवारात शेतात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शाम पानेगावकर यांना मिळाली. त्यावरून त्यांनी एक पथक तयार करुन आणि सोबत दोन पंच घेऊन जुगार अड्यावर धाड मारली.
नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर रातोळी येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत २९ जुगाऱ्यांना अटक केली होती. तलबिड येथे अशीच कारवाई करुन १२ जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. नायगाव पोलिसांकडून अशा कारवाया का होत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी छापा मारल्याचे लक्षात येताच जुगार अड्डा चालवणारे यांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. १० जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ८०० रुपयाची रोख रक्कम व ९ मोबाइल आणि पाच दुचाकी असा एकूण ६ लाख ११ हजारांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी बालाजी बळवंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis