
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।
महानगरपालिका निवडणुकीसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील इमारत अधिगृहीत करण्यात आली.निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर यांनी पाहणी केली.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी, सिलिंग कार्यवाही, मतदान केंद्रांवर पथके रवाना करणे, मतदानानंतर ईव्हीएम व निवडणूक साहित्य जमा करणे तसेच मतमोजणी केंद्र स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आरकेव्हीवाय वर्कशॉप, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ड्रॉइंग हॉल लॅब व वर्गखोली क्रमांक 3 ही इमारत अधिगृहीत करण्यात आली आहे.
या इमारतीची पाहणी व निवड निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर, निवडणूक निर्णय अधिकारी जिवराज डापकर, विद्या मुंडे, उदयसिंह भोसले, रतनसिंह साळोक, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे व पवन देशमुख यांनी केली. त्यानुसार संबंधित इमारत परभणी महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आली असून येथे मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी व सिलिंग प्रक्रिया, मतदान केंद्रांवर पथके पाठविणे, मतदानानंतर ईव्हीएम व साहित्य जमा करणे तसेच मतमोजणी केंद्र उभारण्याची संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis