नांदेड : पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव यात्रा महोत्सवाचे आयोजन
नांदेड, 27 डिसेंबर (हिं.स.)। हिमायतनगर तालुक्यातील सवना ज.. रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डीज, पिछोडी या भागातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेवाची यात्रा ५ जानेवारी रोजी सकाळी
नांदेड : पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव यात्रा महोत्सवाचे आयोजन


नांदेड, 27 डिसेंबर (हिं.स.)।

हिमायतनगर तालुक्यातील सवना ज.. रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डीज, पिछोडी या भागातील पाचशिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेवाची यात्रा ५ जानेवारी रोजी सकाळी महा अभिषेक, दुपारी महाप्रसादानंतर सुरू होणार असून जानेवारी रोजी कुस्ती स्पर्धेने यात्रेचा समारोप होणार आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी महाअभिषेक झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे.

महाप्रसादानंतर लेझीम स्पर्धेस सुरुवात होणार असून पहिले बक्षीस ७००१ रुपये, दुसरे ३००० रुपये,तिसरे १५०१ रुपयांचे आहे. रात्रीला भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, यात्रा कमिटीच्या वतीने पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. देशी बैलजोडी, देशी गाय गट, देशी वळु, देशी कालवड विभागांचा समावेश होणार आहे. पशुपालकानी आपल्या गटांना सहभागी व्हावे, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. योगेंद्र येवतीकर यांनी केले आहे. ६ जानेवारी रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा होणार असून पहिले बक्षीस ५००० रुपये, दुसरे ३००१ रूपये, तिसरे १५०१ रुपये असून ६ जानेवारी रोजी दुपारी शालेय मुलांच्या स्पर्धा होणार असून पहिले बक्षीस २५०१ रुपये, दुसरे २००१ रुपये, तिसरे बक्षीस आहे. शालेय खो खो स्पर्धा मुलीच्या प्रथम बक्षीस २००१ रुपये, दुसरे बक्षीस १५०१ रुपये, तिसरे बक्षीस ५०१ रूपये आहे. ७ जानेवारी रोजी शंकरपट स्पर्धा होणार असून जनरल गटांचे पहिले बक्षीस २५००० रूपये, दुसरे बक्षीस १५००१ रुपये, तिसरे बक्षीस १०००१ रूपये, चौथे बक्षीस ७००० रुपये असे अकरा बक्षीस आहेत. तसेच शंकरपट ड गटाचे गटाचे पहिले बक्षीस १०००१ रुपये, दुसरे बक्षीस ५००१ रुपये, तिसरे बक्षीस ४००१ रुपये, चौथे बक्षीस ३००१ रूपये, पाचवे बक्षीस २००१ रुपये, सहावे बक्षीस ३००१ रूपये, सातवे बक्षीस २५०१ रूपये, आठवे बक्षीस २००१ रुपये, नववेबक्षीस १३०१ रूपये आहेत. ९ जानेवारी रोजी दुपारी कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ आ बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे.

खा. नागेश पाटील आष्टिकर, शिवसेना उपनेते आ हेमंतभाऊ पाटील, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर माजी खा. सुभाषराव वानखेडे यांच्यासह मान्यवरांना विशेष

अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

कुस्तीचे पहिले बक्षीस ७००१ रूपये, १५००१ रुपयांच्या कुस्त्या, दुसरी कुस्ती २५०१ रुपये, तिसरी कुस्ती २००१ रुपये, चौथी कुस्ती १५०१ रुपये, पाचवी कुस्ती ७०१ या शिवाय प्रत्येकी १००० रुपयांच्या कुस्त्या होणार आहेत. तेव्हा या यात्रा महोत्सवात परिसरातील भाविक भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष कामणराव वानखेडे, गणेशराव भुसाळे, गुणाजी आडे, सत्यवृत ढोले, प्रकाशदादा जाधव, नागोराव बुरकूले, गोविंद काळे, आनंद बोलसटवार यांच्यासह कमिटीने केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande