शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपुरातील शेतकऱ्यांचा विरोध
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीच्या रेखांकानुसारच हा महामार्ग तयार करावा,
शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपुरातील शेतकऱ्यांचा विरोध


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. पूर्वीच्या रेखांकानुसारच हा महामार्ग तयार करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या भागातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान, सरकारने जो महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे भाजपचे किसान मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गात सोलापूरपासून बदल करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे सांगत, आमच्या जमिनी द्यायला तयार असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande