अमरावती - वरुड तालुक्यात तलाठी कर्मचाऱ्यांची कमतरता; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.) तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून एक मंडळ अधिकारी व तलाठ्याची ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेती ब मुलांसाठी दाखले मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकरिता तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरण्य
अमरावती - वरुड तालुक्यात तलाठी कर्मचाऱ्यांची कमतरता; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष


अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.)

तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून एक मंडळ अधिकारी व तलाठ्याची ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर शेती ब मुलांसाठी दाखले मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकरिता तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.सततच्या पावसामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. गावात तलाठी, मंडळ अधिकारी नसल्याने शेतक-यांना ७/१२, आठ अ, उत्पत्राचा दाखला, फेरफार व विद्यार्थ्यांसाठी लागणारी कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना तलाठी कार्यालयाच्याचकरा माराव्या लागत आहेत. तालुक्यातील शेतकरी कंटाळला असून लोणी, करजगाव, वाडेगाव, सुरळी, घोराड, पोरगव्हाण येथे तलाठी मिळावा यासाठी अनेकदा निवेदनेसुद्धा दिली आहेत.वरुड तालुक्यात लोणी व बरुड भाग २, करजगाव, चाडेगाव, सुरळी,घोराड, पोरगव्हाण, उराड, गणेशपूर, लिगा, झटामझिरी आदी ठिकाणी कर्मचाऱ्याऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे यासर्व ठिकाणी कर्मचारी मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती बरुड तहसीलच्या आस्थापना विभागातील अधिकारी रवी पवार यांनी दिली.

उराड, गणेशपूर, लिंगा, अटामझिरी आदी गावात मंडळ अधिकारी व एकूण ११ तलाकृपांची पदे रिक्त आहेत. बासर्व गावांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, यासाठी शेतकऱ्यांनी वरुड तहसीलदार, मोशींचे उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, खासदार अनिल बोंडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार देवेंद्र भुयार, आमदार बंद ऊर्फ उमेश यावलकर यांना अनेक निवेदने दिली. तसेच अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. रिक्त पदे भरण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण आजपर्यंत एकही पद भरण्यात आले नाही. त्यामुळे आता न्याय कोणाला मागावा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande