
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.
आढावा सुशासनाचा विश्वास थेट संवादाचा घागा आहे. यातून जनतेचे प्रश्न मार्गी लागतात, असे प्रतिपादन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. पाली महसूल मंडळात सुसाशन सप्ताहानिमित्त आहेर वडगाव येथे मंडळस्तरीय बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यांनी थेट ग्रामस्थांमध्ये बसून संवाद साधला. शेतकरी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, महसूल व इतर विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पाणी, शेती, महसूल दाखले, ओळखपत्रे, योजना, अनुदाने, अॅग्रीस्टॅक, पीकविमा, जमीन विषयक अडचणी ऐकून घेतल्या.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे निर्णय गावपातळीवर पोहोचावेत, नागरिकांच्या अडचणी गावातच सोडवाव्यात, हा संदेश देण्यात आला.सप्ताहाची अंमलबजावणी सुरू आहे.
आहेर वडगाव येथे सुसाशन सप्ताहांतर्गत मंडळस्तरीय आढावा बैठक झाली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गावातच प्रमाणपत्र वाटप केले.
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी थेट ग्रामस्थांत बसून समस्या ऐकून घेतल्या, मार्गदर्शन केले आणि अनेक प्रकरणांवर जागेवरच उपाय सुचवले. प्रमाणपत्रे, दाखले, ओळखपत्रे व विविध योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या हातात मिळाल्याने ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण दिसून आले.
शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. प्रमाणपत्रे, दाखले, ऊसतोड कामगार ओळखपत्र, धरणग्रस्त प्रमाणपत्र, दाखले, डोमेसाइल प्रमाणपत्र, फार्मर आयडी यांचे थेट वाटप झाले.
'
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis