परभणी : टोनी वरपुडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते विजयराव वरपुडकर यांचे चिरंजिव ऐश्‍वर्य उर्फ टोनी वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस
अ


परभणी, 27 डिसेंबर (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाचे नेते विजयराव वरपुडकर यांचे चिरंजिव ऐश्‍वर्य उर्फ टोनी वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी टोनी वरपुडकर यांच्यासोबत गजानन विश्‍वनाथ जोगदंड, सय्यद अतिक सय्यद अमीर व सुरेश पांचाळ यांनीही जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहरात व प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला आहे. या पक्षप्रवेशास विजयराव जामकर, रामेश्वर आवरगंड, माजी नगरसेवक राजू शिंदे, सुरेश काळे, दिपक वारकरी आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande