
मुंबई, 27 डिसेंबर, (हिं.स.)। भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला आज (दि.२७) पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर